शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अँप मॅसेजने वाचविले चार ‘प्राण’!

By admin | Updated: July 18, 2016 02:11 IST

सोशल मिडीयावरील आवहनास प्रतिसाद देत ए निगेटिव्ह रक्तगटाचे रक्तदाते सरसावले!

अकोला: सध्या सोशल मीडियाचा प्रभाव आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला व्यापून टाकत आहे. या सोशल मीडियामुळे दोन समाजात, दोन धर्मात तेढ निर्माण होण्यापासून तर याच्या अतिरेकी वापरामुळे संसारही तुटण्याचे प्रसंग समोर आले आहेत; मात्र याच सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर जीवनदान मिळू शकते याचे प्रत्यंतर अकोल्यात आले आहे. ए निगेटिव्ह या रक्ताची गरज सर्वोपचार रुग्णालयाला होती. त्याची माहिती व्हॉट्स अँपवरून फिरल्यामुळे तब्बल आठ रक्तदाते रुग्णालयात उत्स्फूर्तपणे दाखल झाले व चार रुग्णांचे प्राण वाचले. अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात रेखा मोहन गोंधळे ही बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील गरीब कुटुंबातील महिला स्त्री कक्षात उपचार घेत आहे. १३ जुलै रोजी रेखाला बाळंतपणासाठी अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १४ ला सकाळी रेखाला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर तिला प्रसूती कक्षात नेण्यात आले; मात्र रेखाचे गर्भाशय आतमध्येच फुटले अन् तिची प्रकृती गंभीर झाली. यामुळे बाळही पोटात दगावले. महत्प्रयासाने मृत बाळ बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले; परंतु यादरम्यान, रेखाचा रक्तस्राव खूप झाल्याने तिला बाहेरून तातडीच्या रक्तपुरवठय़ाची आवश्यकता निर्माण झाली होती. रेखाचा रक्तगट ए निगेटिव्ह होता. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीसह अनेक खासगी रक्तपेढय़ांमध्ये या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे संकट व नातेवाइकांपुढे रेखाच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. तर दुसरीकडे आणखी एक रुग्ण कुबराबानो या महिलेचीही प्रसूती अडली होती तिलाही ह्यएबी निगेटिव्हह्ण रक्ताची आवश्यकता होती. या दोन्ही रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न समोर असल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील यांनी ए निगेटिव्ह रक्तगटाची गरज असल्याचा संदेश रुग्णालयातील आपल्या सहकार्‍यांच्या ह्यव्हॉट्स अँप ग्रुपह्णवर टाकला. याच ग्रुपवर शासकीय वैद्यकीय महाविद्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते हे सुद्धा होते ते १४ जुलै रोजी मुंबईत कार्यालयीन बैठकीसाठी गेले होते. त्यांनी हा व्हॉट्स अँप संदेश वाचताच अकोल्यातील इतर अनेक व्हॉट्स अँप ग्रुपवर फॉरवर्ड केला अन् पुढच्या दोन तासांत अक्षरश: चमत्कार झाला. या दोन तासांत एक-दोन नाहीतर ए आणि एबी निगेटिव्ह रक्तगट असलेले तब्बल आठ रक्तदाते स्वत:हून रक्तदानासाठी शासकीय रुग्णालयात हजार झाले. त्यांनी रक्तदान केले. या दोन्ही महिलांना वेळीच रक्त मिळाले अन् त्यांचा जीव वाचला. दरम्यान, याच रक्तगटाची गरज रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी एका सिकलसेलग्रस्त छोट्या मुलीलाही कमी आली. अशाप्रकारे या रक्तदानाने दोन माता, कुबराबानो यांचे बाळ आणि एका सिकलसेलचा रुग्ण अशा चार जणांचे प्राण वाचले. व्हॉट्स अँपच्या एक व्हायरल झालेल्या मेसेजमुळे आपण चार जणांना जीवन देऊ शकलो याचा मोठा आनंद रुग्णालयातील डॉक्टरांना आहे.