शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड

By admin | Updated: April 26, 2017 02:03 IST

खून आणि मकोकातील आरोपी होते दरोड्याच्या तयारीत

अकोला : निमवाडी बसस्थानकाजवळ दरोड्याच्यी तयारी करीत असलेल्या चार कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी अटक केली. यामधील दोन आरोपी हे खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींकडून धारदार शस्त्र आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.निमवाडी बसस्थानकामागे चार जणांच्या संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी निमवाडी परिसरात छापा टाकून वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथील रहिवासी ओमप्रकाश भरत भटकर (३२), गाडगे नगरातील रहिवासी बंटी भगवान लंकेश्वर (३१), वाशिम जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी साहेबराव आश्रुजी कालापाड (३२) आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी नीलेश बिहारीप्रसाद ठाकूर (२९) यांना अटक केली. यामधील ओमप्रकाश भटकरकडून लोखंडी खंजर, नीलेश ठाकूरकडून दोरी, बंटी लंकेश्वरच्या खिशातील मिरची पावडरच्या पुड्या आणि कालापाड या आरोपीकडून वेगवेगळ्या चाव्यांचा गुच्छा व एक हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी या चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकिरण नावकार, संदीप काटकर, प्रमोद डोईफोडे, राजेश वानखडे, संतोष गावंडे, मंगेश मदनकार व संदीप टाले यांनी केली.