शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराच्या हत्येप्रकरणी चौघे ताब्यात

By admin | Updated: December 11, 2014 00:53 IST

किरकोळ वादातून मारहाण केल्याची कबुली.

अकोला : जुने शहरात राहणारा सराईत गुन्हेगार रऊफ खान सलीम खाम (४२) हा मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धाबेकर फार्म हाऊसजवळील लोणी रोडवरील शेतामध्ये जखमी अवस्थेमध्ये दिसून आला. त्याला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयामध्ये भरती केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनीही किरकोळ वादातून त्याला मारहाण केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. जुने शहरात राहणारा रऊफ खान याची पोलीस दफ्तरी निगरानी बदमाश म्हणून नोंद आहे. पैसे मागण्यासाठी तो अनेकांशी किरकोळ वाद घालायचा. पैसे दिले नाहीतर स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून इजा पोहोचवायचा. त्यामुळे अनेकजण त्याच्याशी वाद न घालता, त्याला पैसे द्यायचे. पोलीस ठाण्यामधील कर्मचार्‍यांनासुद्धा पैसे मागायचा. सोमवारी रऊफ खान हा पोळा चौकातील जयस्वाल देशी दारूच्या दुकानावर दारू पिण्यासाठी गेला होता. त्याचा रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास दुकानातील कर्मचार्‍यांसोबत वाद झाला. त्यामुळे दुकानातील सागर डोंगरे, कुंदन पटेल, कृष्णा वाडेकर आणि नटवरलाल नामक कर्मचार्‍यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रऊफ जखमी झाला. चारही कर्मचार्‍यांनी त्याला उचलून धाबेकर फार्म हाऊसजवळील लोणी रोडवरील एका शेतामध्ये सोडून दिले आणि हे कर्मचारी तेथून पसार झाले. मंगळवारी सकाळी ही घटना नागरिकांना कळली. त्यांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जखमी अवस्थेतील रऊफ खान यास सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रऊफ याची पत्नी व मुलाने पोलिसांनी रऊफला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणी जयस्वाल दुकानावरील चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी रऊफला मारहाण केल्याची कबुली दिली.