शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील शेतमजूर ‘अन्न सुरक्षा’ बाहेरच!

By admin | Updated: July 12, 2016 00:54 IST

शेतमजूरांच्या याद्या तयार आहे; शासन निर्णयाची प्रतीक्षा.

अकोला : दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्यात येत आहे. शेतकर्‍यांसोबतच शेतमजुरांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत शेतमजुरांच्या याद्या तयार करण्यात आल्या; परंतु, सवलतीच्या दरात धान्य वाटपाबाबत शासनाचा निर्णय अद्याप प्राप्त झाला नसल्याने, विभागातील शेतमजूर ह्यअन्न सुरक्षाह्ण योजनेच्या लाभापासून अद्याप बाहेरच आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली. अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात ३ रुपये किलो दराने तांदूळ व २ रुपये किलो दराने गहू वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै २0१५ रोजी घेण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याची मागणी विचारात घेता, शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याचे शासनामार्फत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील शेतमजुरांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतमजूर लाभार्थींची निवड करून याद्या तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी गत १२ फेब्रुवारी रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार अमरावती विभागात शेतमजुरांच्या याद्या तयार करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात आले असले तरी, शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय अद्याप शासनामार्फत घेण्यात आला नाही. तसेच यासंबंधीचा शासन आदेश पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतमजूर अद्यापही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.