शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये फुलविले कमळ!

By admin | Updated: July 19, 2016 01:51 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी अकोला शहरात अभिनव आंदोलन करून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांकडे वेधले लक्ष.

अकोला : गल्लीपासून दिल्लीपर्यंंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही नागरिकांना अजूनही अच्छे दिन आले नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी अकोला शहरात अभिनव आंदोलन करण्यात आले. शहरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांंनी खड्डय़ांमध्ये साचलेल्या पाण्यात भाजपचे चिन्ह असलेले कमळ फुलविले. शहरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकार नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असून, सर्व जन ह्यमिल बाटके खायेंगेह्णच्या वृत्तीत असल्याचा आरोप करीत मनसे महानगर अध्यक्ष सौरभ भगत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भाजपने दिलेल्या अच्छे दिन, सबका विकास, मेक इन इंडिया आदी आश्‍वासनांचा निषेध म्हणून यावेळी मनसे कार्यकर्त्यांंनी नागरिकांना चॉकलेट वाटले. शासन व लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची दखल घेऊन योग्य पावले न उचलल्यास आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी भगत यांनी दिला. याप्रसंगी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले, जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, मनसे माजी नगरसेवक पंकज साबळे, महानगर उपाध्यक्ष सचिन गव्हाळे, राजेश पिंजरकर, राकेश शर्मा, चंदू अग्रवाल, अमर बेलखेडे, संतोष नंदाने, सतीश फाले, सतीश वानरे, सचिन बोंद्रे, ललीत यावलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.