लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाच पोलीस स्टेशनला ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ बनविण्यात येणार आहे. राज्यभरात हा प्रयोग राबविण्यात येणार असून, त्यातील हा दुसरा टप्पा आहे. याआधी शहरातील खदान व सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन बनविण्यासाठी निवडण्यात आले होते.पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून राज्यभरात ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ बनविण्याची तयारी करण्यात येत आहे. यामध्ये पहिला टप्पा हा पार पडला असून, या टप्प्यात खदान आणि सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सिटी कोतवाली, अकोट शहर, बाळापूर, मूर्तिजापूर शहर आणि माना पोलीस स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. या ठाण्यातील ठाणेदारांची बैठक बुधवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासमक्ष घेण्यात आली. या बैठकीमध्ये ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’च्या निकषाबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार काम करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या पाच ठाण्यांमध्ये स्मार्ट ठाण्याच्या कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे.असे आहेत निकषस्मार्ट पोलीस स्टेशनसाठी पोलीस सेवा आधुनिक व शास्त्रोक्त करणे, व्यावसायिक दृष्टिकोनातून दिली जाणार, पोलीस व जनता यांच्यामधील समन्वय वाढविणे, तपासामध्ये गतिमानता आणून दोषसिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, पोलीस कामकाजामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे व पोलीस स्टेशनमधील सेवा जनताभिमुख करण्याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.
पाच पोलीस स्टेशन होणार ‘स्मार्ट!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 01:26 IST