शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपूर्वी तक्रार नोंदविली, गुन्हा दाखलच झाला नाही!

By admin | Updated: July 8, 2016 02:22 IST

अकोला मनपातील बनावट प्रमाणपत्र: सिटी कोतवाली पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह

अकोला: महापालिकेच्या स्वच्छता विभागातील तीन महिला सफाई कर्मचार्‍यांनी सादर केलेले आरोग्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाने १२ फेब्रुवारी रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मनपाला तक्रार नोंदवून पाच महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.महापालिकेच्या स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत तीन महिला कर्मचार्‍यांनी ऐच्छिक सेवानवृत्ती घेण्यासाठी आपण काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर केले होते. तीनही कर्मचार्‍यांनी सवरेपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीचे सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत महापालिका आयुक्त अजय लहाने यांना शंका आल्याने त्यांनी कर्मचार्‍यांनी सादर केलेले प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवले. शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार असे कोणतेही प्रमाणपत्र जिल्हा सवरेपचार रुग्णालयातून देण्यात आले नसल्याचे मनपाला कळवले. बनावट प्रमाणपत्राचा भंडाफोड करण्याच्या उद्देशातून आयुक्त अजय लहाने यांनी तीनही महिला सफाई कर्मचार्‍यांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्याचे निर्देश सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर यांना दिले. घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी रोजी पोलीस तक्रार नोंदवण्यात आली. सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवून प्रशासनाला पाच महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष. गुन्हा दाखल करण्यास होणारी टाळाटाळ पाहता सिटी कोतवाली पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.