अकोला, दि. २२ : आकोट फैलमधील पूरपीडित कॉलनी येथील एका युवकावर याच परिसरातील रहिवासी एका टोळक्याने धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर हे पाचही आरोपी रविवारपासून फरार आहेत. जीआरपी पोलीस या आरोपींचा शोध घेत असून, या हल्ल्यातील जखमीचीबाहे प्रकृती धोक्यार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.पूरपीडित कॉलनी येथील रहिवासी फैजल खान खालीद खान याचा याच परिसरातील रहिवासी शेख तस्लीम शेख गणी, शेख जमीर शेख गणी, शेख रहीम शेख गणी, एजाज खान आणि मीरबाज खान यांच्याशी १२ जानेवारी रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये वाद झाला होता. या वादानंतर हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणाची तक्रार फैजल खान खालीद खान यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. १२ जानेवारीपासून या टोळक्याचा फैजल खान यांच्याशी वाद सुरू असतानाच त्यांनी रविवारी पहाटे रेल्वे स्टेशन चौकात त्याच्यावर कत्ता, चाकू, तलवार आणि लोखंडी पाइपने जीवघेणा हल्ला चढविला. यामध्ये फैजल खान गंभीर जखमी झाला. या प्राणघातक हल्ल्यानंतर शेख तस्लीम शेख गणी, शेख जमीर शेख गणी, शेख रहीम शेख गणी, एजाज खान आणि मीरबाज खान हे पाचही आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे; मात्र पोलिसांना त्यांचा पत्ता लागलेला नाही.
प्राणघातक हल्ल्यातील पाचही आरोपी फरारच!
By admin | Updated: August 23, 2016 01:06 IST