शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दशकभरात पहिल्यांदाच पावसाळा वेळेवर!

By admin | Updated: June 24, 2015 01:35 IST

४८ तासातच सरासरीच्या अर्धा पाऊस; खंड पडण्याची शक्यता.

राजरत्न सिरसाट/अकोला: दशकभरात यावर्षी प्रथमच वेळेवर पावसाळा सुरू झाला असून, जून महिन्यातच अनेक ठिकाणी दीडपट पाऊस पडला आहे; पण पावसाचे स्वरू प असमान आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात सरासरी जेवढा पाऊस पडतो, त्याच्या अर्धा पाऊस ४८ तासात पडण्याचे प्रमाण वाढल्याने पुढील महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १0 ते १२ जून रोजी पावसाने सुरुवात केली असून, राज्यात जून महिन्यामध्ये सरासरी २२३. ३ मिमी पाऊस झाला आहे. १९ जूनपर्यंत हा पाऊस १0६. ३ मिमी झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या ४६.६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमानाची आकडेवारी बघितल्यास १९ जूनपर्यंत कोल्हापूर जिल्हय़ात २५ टक्के पाऊस झाला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, पुणे, सातारा उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर या १२ जिल्हय़ात २५ ते ५0 टक्के पाऊस झाला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा व गडचिरोली या १७ जिल्हय़ात ५0 ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली व वाशिम या तीन जिल्हय़ात ७५ ते १00 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हय़ात १00 टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला जिल्हय़ात दीडपट पाऊस झाला आहे; पण याच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांची पेरणी खोळंबली आहे. अमरावती जिल्हय़ात २८५ मिमी पाऊस झाल्याने पेरणीसाठी शेतीला वाफसा येण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. राज्यात पावसाचे असे विषम स्वरू प आहे. काही ठिकाणी अतिवेगाने तर काही ठिकाणी रिमझिम पडणार्‍या या पावसामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.