शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हय़ाचा राज्यातील पहिला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:40 IST

न्यायालयाने या भोंदूबाबाला जादूटोणा कायद्यांतर्गत दोषी ठरवित, त्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. जादूटोणा कायद्यांतर्गत राज्यातील पहिला निकाल असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी शुक्रवारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत केला. 

ठळक मुद्दे भोंदूबाबास तीन वर्षांचा कारावाससंभाजी ब्रिगेडच्या लढय़ाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाश्रीटाकळी तालुक्यातील मांडोली येथे अनेक वर्षांपासून माणिक महाराज ऊर्फ माणिक कसणदास जाधव हा देवीच्या मंदिरात अमावस्या व पौर्णिमेला दरबार भरवून अंगात देवी येत असल्याची बतावणी करून भाविकांना लुटत होता. त्याच्या कारनाम्यांचा संभाजी ब्रिगेडने भंडाफोड करून त्याचा भोंदूपणा जनतेसमोर उघड केला. त्याच्याविरुद्ध बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात राज्यातील जादूटोणा कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल केला. चार वर्षांनंतर न्यायालयाने या भोंदूबाबाला जादूटोणा कायद्यांतर्गत दोषी ठरवित, त्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. जादूटोणा कायद्यांतर्गत राज्यातील पहिला निकाल असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी शुक्रवारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत केला. अनेक वर्षांपासून माणिक महाराज हा नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन, त्यांना लुबाडत होता. १४ मे २0१४ रोजी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष डॉ. पारधी यांनी, त्याचा भोंदूपणा उघड केला आणि पोलिसात भोंदूबाबाविरुद्ध तक्रार दिली. तत्कालीन ठाणेदार देवराज खंडेराव यांनी भोंदूबाबाविरुद्ध राज्यातील पहिला जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरणात साक्षीदार म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, गजानन चोपडे, कुलदीप तराळे, पातूर तालुकाध्यक्ष प्रदीप काळपांडे यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले होते. पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दरम्यान, माणिक महाराजाने साक्षीदारांवर दबाव टाकण्यासोबतच त्यांच्यावर हल्ले करण्याचेदेखील प्रयत्न केले. अखेर न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध साक्ष व पुरावे सबळ असल्याने, न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. राज्यामध्ये जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. संभाजी ब्रिगेडने यापूर्वीही जिल्हय़ातील अनेक भोंदूबाबा व ज्योतिषांना पोलिसांच्या सहकार्याने पकडून दिले आहे. हे गुन्हे प्रलंबित आहेत. सहा महिन्यांच्या काळात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे आणि ते प्रकरणसुद्धा संभाजी ब्रिगेडने अकोट फैल पोलीस ठाण्यात इच्छाधारी महाराजाविरुद्धचे प्रकरण दाखल केले. जादूटोणा कायदा लागू करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे मोठे योगदान आहे, अशी माहिती पंकज जायले यांनी देत, आता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात भोंदूमहाराज, ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ यांना शोधून काढून त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार आहे. नागरिकांनीसुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी न घालता, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना या कार्यासाठी मदत करावी, असेही जायले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालय