शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कमल सोसायटीमध्ये घराला आग

By admin | Updated: January 6, 2017 02:42 IST

स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक

अकोला, दि. ६- सर्वोपचार रुग्णालयासमोरील कमल सोसायटीत राहणारे अशोक लोढाया यांच्या घरामध्ये अचानक आग लागली. आगीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी जीव धोक्यात घालून धगधगत्या आगीतून स्वयंपाकघरातील दोन गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यश मिळविले. अन्यथा सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. कमल सोसायटीत राहणारे अशोक लोढाया यांच्या घरातील इलेक्ट्रिक मीटरने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच आगीने उग्र स्वरूप धारण केले. आग घरातील स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना माहिती मिळताच ते घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना, अग्निशमन दलाचे कर्मचारी धुपेंद्रसिंह पवार यांचे लक्ष स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलिंडरवर गेले. सिलिंडरसुद्धा आगीच्या टप्प्यात येणार होते; परंतु त्यापूर्वीच धुपेंद्रसिंह यांनी जीवाची पर्वा न करता, दोन्ही सिलिंडर घराबाहेर आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी वित्त व प्राणहानी झाली असती. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असावी, असा अंदाज आहे. आगीमध्ये घरातील हजारो रुपयांचे साहित्य जळाले. रात्री उशिरापर्यंंत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.