मूर्तिजापूर : हेंडज शिवारात असलेल्या एका फार्म हाऊसला शनिवार, ३१ मे रोजी दुपारी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जनावरांचे खाद्यान्न व इमारत जळून खाक झाली. येथील भोलाशंकर हिरालाल गुप्ता यांचे हेंडज शिवारात फार्म हाऊस असून, शनिवारी दुपारी या फार्म हाऊसला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने उग्ररूप धारण केले व काही क्षणातच इमारत जळून खाक झाली. या इमारतीमध्ये ठेवलेले कुटारही भस्मसात झाले. यावेळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दलाच्या कर्मचार्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीमुळे गुप्ता यांचे अंदाज दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
फार्म हाऊसला आग
By admin | Updated: May 31, 2014 22:01 IST