शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

अखेर कृषी विद्यापीठालगतच्या बंधार्‍यांचा प्रस्ताव पाठवला!

By admin | Updated: November 21, 2014 02:10 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सतत दुर्लक्ष केल्याने या विद्यापीठालगत नाल्यावर बंधारा बांधण्याचा प्रस्ताव अखेर जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे पाठविला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्राला लागून तीन नदी वजा नाले आहेत. या नाल्यांतून दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. हे पाणी वाहून जाण्याच्या मार्गात रेल्वेचा मोठा पूल असून, अनेक वेळा पूरस्थिती निर्माण होते. त्यावर उपाययोजना म्हणून अकोला-पळसो मार्गावर यावलखेड येथेही पूल बांधण्यात आला आहे. गुडधी-बोंदरखेड-सिसा या गाडवाटेच्या मार्गावर तीन नाल्यांचा संगम असून, या नाल्याचे पात्र पावसाळ्य़ात नदीप्रमाणे वाहते. त्यामुळे या ठिकाणी बंधारा बांधल्यास भूगर्भातील पाणी वाढेल आणि कृषी विद्यापीठालादेखील त्याचा वापर करता येईल, हा उद्देश डोळ्य़ासमोर ठेवण्यात आला होता. हेच पाणी अडवून कृषी विद्यापीठालगत बंधारा बांधण्याचा प्रस्ताव कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी तयार केला होता. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांसोबत जागेचे सर्वेक्षण केले होते. तत्कालीन कृषी व जलसंधारण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. हा प्रस्ताव तेव्हापासून पुढे सरकलाच नाही. कृषी विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील विद्यापीठाची शेकडो हेक्टर शेती पडीक पडली आहे. विद्यापीठाने या ठिकाणी बांधलेला तलावदेखील पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेकदा वाहून गेला आहे. कृषी विद्यापीठाने या भागात आवळा लागवडीचा प्रयोग केला होता. तथापि, तो प्रयोग फसला आहे. या भागाकडे कृषी विद्यापीठाचे लक्ष नसल्याचेच वारंवार निदर्शनास येत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या बाभुळगाव सर्कल सदस्य सरला मेश्राम यांनी या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करू न जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे पाठविला. येत्या २८ नोव्हेंबर रोजी या बंधार्‍याच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी करण्यात येणार आहे.