शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गांधी रोडवरील अतिक्रमकांना हुसकावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 02:10 IST

बालाजी मॉलला २0 हजारांचा दंड.

अकोला: शहरवासीयांना अतिक्रमणाचा सर्वाधिक त्रास गांधी रोडवरील जैन मंदिर परिसर तसेच खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या परिसरात होतो; मात्र या भागातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण मनपा प्रशासनाने स्वीकारल्याचे चित्र होते. अकोलेकरांच्या भावना लक्षात घेता, ह्यलोकमतह्णने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी तातडीने या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जारी केले. मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्यासह अतिक्रमण विभागाने रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याप्रकरणी बालाजी मॉलकडून २0 हजार रुपये दंड वसूल केला. मनपा प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागांमध्ये रस्त्यावर ठाण मांडणार्‍या अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई दररोज होत आहे. यामध्ये गांधी रोड, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतचा मुख्य रस्ता वगळता, इतर भागांमध्ये अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ शहराच्या मध्यवर्ती भागात एकवटली आहे. खुले नाट्यगृह परिसर ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर कापड बाजाराची मोठी बाजारपेठ आहे. गांधी रोडवर रेडीमेड कपड्यांसह विविध गृहपयोगी वस्तूंची विक्री होते, तर जैन मंदिर परिसरात जुना भाजीबाजार, किराणा बाजार असल्याने या ठिकाणी सतत वर्दळ राहते. साहजिकच, वस्तूंच्या खरेदीसाठी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. मुख्य रस्त्यांसह मनपाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण कायम आहे. शहरवासीयांना अतिक्रमणाचा सर्वाधिक त्रास या परिसरात होतो. साहजिकच, मनपाकडून या भागात कारवाई करणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या तक्रारींना ह्यलोकमतह्णने वाचा फोडल्यानंतर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जारी केले. मंगळवारी सायंकाळपर्यंत अतिक्रमण निर्मूलन विभागाने गांधी रोड, जैन मंदिर परिसर, मोहम्मद अली मार्गालगतच्या अतिक्रमकांना हुसकावून लावले.