शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:40 IST

या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय दिला होता. त्याच भारिप-बमसंचे अस्तित्व अधिकृतरीत्या शुक्रवारी संपुष्टात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप-बमसं विलीन करण्यात आला असून, २० नोव्हेंबरपर्यंत प्रदेश कार्यकारिणी तर ३० नाव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच अ‍ॅड. आंबेडकरांनी भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन करणार, असे सूतोवाच केले होते; मात्र ‘वंचित’च्या जिल्हा कार्यकारिणीही त्यांनी गठित करून भारिप-बमसंचे अस्तित्व कायम ठेवले होते. विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला मिळालेली मते ही ‘वंचित’ची ताकद वाढली असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर ८ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप-बमसं विलीन करण्याची घोषणा त्यांनी मुंबईत केली आहे. या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा यशस्वी प्रयोग अकोल्यात केला. अकोला पॅटर्न नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रयोगाचे ‘भारिप बहुजन महासंघ’ हे राजकीय नाव होते. ८० च्या दशकात या प्रयोगाची सुरुवात झाली असली तरी १९९० ते २००४ पर्यंत या प्रयोगाने अकोल्यात सुवर्णकाळ अनुभवला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे एकहाती नेतृत्व अन् दलित समाजासोबत अठरापगड जातींची बांधलेली मोट, यामुळेच अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना यश अनुभवता आले. अकोला जिल्हा परिषदेत दोन दशकांपासून सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश आले. मखराम पवार, दशरथ भांडे, रामदास बोडखे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार असे आमदारही विधानसभेत पोहोचले; मात्र अ‍ॅड. आंबेडकर हे स्वत: १९९९ नंतर सलग लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून अठरापगड जातींच्या अस्मितेला फुंकर घालून धनगर, माळी, भटके अशा विविध प्रवर्गाच्या परिषदा घेऊन बहुजन मतांचा जागर एकीकडे केला, तर दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणात आक्रमक भूमिका घेत दलितांची मते अन् मने एकवटण्याचाही प्रयोग केला. या प्रयोगांमुळे आंबेडकरांचे राजकीय वजन वाढले होते अन् वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने चक्क एमआयएमसारख्या आक्रमक पक्षासोबम मैत्री करून निवडणूक लढविली; मात्र एमआयएमचा एक खासदार विजय झाला अन् अ‍ॅड. आंबेडकरांच्या झोळीत केवळ मतांची टक्केवारी वाढली. ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी टीम’ आहे इथपासून तर आतातरी अ‍ॅड. आंबेडकरांनी भाजपाविरोधात महाआघाडी निर्माण करून आव्हान देण्याची गरज व्यक्त होऊ लागली. ‘वंचित’च्या माध्यमातून आंबेडकरांचे उपद्रवमूल्य सिद्ध झालेच होते.त्यामुळे विधानसभेत अशी महाआघाडी निर्माण होऊन उपयुक्तमूल्य सिद्ध होणार का, अशी चर्चा रंगत असतानाच ‘वंचित’चा मित्रपक्ष असलेल्या एमआयएमनेही काडीमोड घेतला व ‘वंचित’ने एकाकी झुंज देत विधानसभा लढविली. या निवडणुकीत ‘वंचित’च्या हाती एकही जागा लागली नाही. विधानसभेतील त्यांचे अस्तित्व शून्य ठरले. ‘वंचित’ला संख्यात्मक यश मिळाले नसले तरी गुणात्मकरीत्या ‘वंचित’ने अनेक विधानसभा मतदारसंघांत दुसºया क्रमांकाची मते मिळविली आहेत. त्यामुळे आगामी राजकीय वाटचाल ‘वंचित’च्याच माध्यमातून होणार असून, आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण