शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील जुन्या नोटांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 22, 2017 04:49 IST

आरबीआय जुन्या नोटा स्वीकारणार; अकोला बँकेकडे ९४ कोटी, तर बुलडाण्यात ९३ लाखांची शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील जिल्हा बँकांमध्ये असणार्‍या ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार ३0 जूनपयर्ंत जिल्हा बँकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा आरबीआयमध्ये भरता येणार आहेत. यामुळे अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या ९४ कोटी, तर बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेतील ९३ लाखांच्या शिल्लक रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे. रिझर्व्ह बँकेने ५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेतला होता. नोटाबंदीनंतर तीन दिवसांत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. याबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने काढला होता. त्यामुळे जिल्हा बँकांमध्ये गेली सहा महिने पडून असलेले या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर होता. नोटाबंदीनंतर सर्वसामान्य लोकांनी ८ नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर या काळात जिल्हा बँकेत भरलेल्या नोटांचाही यामध्ये समावेश आहे. जिल्हा बँकेत भरलेल्या जुन्या नोटा आरबीआयने घ्यायला नकार दिल्यामुळे बँका अडचणीत आल्या होत्या. पण, केंद्राच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांना दिलासा मिळणार आहे. केंद्राने योग्य ती तपासणी करून हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार आरबीआय स्वीकारणार आहे. अकोला जिल्हा बँकेत तब्बल ९४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी दिली, तर बुलडाण्यात ९३ लाखांची शिल्लक आहे. ही रक्कम आता आरबीआय स्वीकारणार असल्याने बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्ज वाटपासाठी होणार मदतसध्या शेतकर्‍यांना तत्काळ दहा हजारांचे कर्ज वाटप, तसेच पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना रकमेची आवश्यकता आहे. अशा स्थितीत आरबीआय नोटा स्वीकारणार असल्याचा निर्णय झाल्यामुळे याचा लाभ कर्ज वाटपासाठी होणार आहे. बुलडाणा जिल्हा बँक ही आता अडचणीतून बाहेर येत असून, आर्थिक व्यवहार सुरळीत होत आहेत. नोटाबंदीनंतर बँकेकडे ९३ लाखांच्या जुन्या नोटा आहेत, त्या स्वीकारल्या जाणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.- डॉ.अशोक खरात, सीईओ बुलडाणा जिल्हा सहकारी बँकया निणर्यामुळे कृषी कर्ज वाटपासाठी मोठी रक्कम बँकेकडे उपलब्ध होणार असल्याने बँकेवरील आर्थिक ताण कमी होईल. - अनंत वैद्य, सीईओ अकोला जिल्हा सहकारी बँक