शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

चांगेफळ येथे जुन्या वादातून हाणामारी, नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST

जुन्या वादाच्या कारणावरून एक आरोपीने विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडून विनयभंग केला. विवाहितेने आरडाओरडा केल्यावर नऊ आरोपींनी ...

जुन्या वादाच्या कारणावरून एक आरोपीने विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडून विनयभंग केला. विवाहितेने आरडाओरडा केल्यावर नऊ आरोपींनी विवाहितेच्या आईला कपाशी उपटण्याच्या लोखंडी चिमटा व लाठ्या काठ्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये विवाहितेची आई चंद्रकलाबाई मधुकर घटे गंभीर जखमी झाल्या आहेत. तिच्या नातेवाइकांनी गंभीर महिलेला घेऊन चान्नी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी गंभीर महिलेला उपचारासाठी चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय येथे हलविले आहे. या प्रकरणी गंभीर चान्नी पोलिसांनी आरोपी रामेश्वर नागोजी चवरे, महादेव नागोजी चवरे, श्रीकृष्ण गजानन बघे, मंगेश गजानन बघे व पाच महिला अशा एकूण नऊ आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२६, ३५४, ४५२, ३२४, १४३, १४७, १४८, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रामेश्वर चवरे, श्रीकृष्ण बघे यांना अटक केली. पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात बाळकृष्ण येवले, सुधाकर करवते करीत आहेत.