शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहारांवरून भाजपात घमासान!

By admin | Updated: December 7, 2015 02:46 IST

पदाधिकारी निवडणुकीतील खर्चाचा हिशेबच लागेना!

अकोला: महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत मोठे 'अर्थकारण' झाले. त्या खर्चाचा अद्यापही हिशेब जुळत नसल्याने अनेक दिवसांपासून भाजपात घमासान सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत प्रदेश स्तरावरील पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आर्थिक व्यवहारावर चांगलीच खलबतं झाली. मनपाच्या तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या महापौर पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने सप्टेंबर २0१४ मध्ये महापौर पदाच्या निवडीसाठी निवडणूक झाली. त्यावेळी महापौरपदी भाजपच्या उज्ज्वला देशमुख, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे विनोद मापारी यांची निवड झाली. विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षनिष्ठा बासनात गुंडाळून ठेवत भाजप-सेनेच्या पारड्यात मतांचे दान टाकले. अर्थातच, मते मिळवण्यासाठी अर्थकारणासह विविध बाबींची पूर्तता करण्यात आली. महापौर व उपमहापौर पदासाठी निवड व्हावी, यावर खर्च करण्यासाठी दोन्ही पक्षांनी युती केली होती, हे येथे उल्लेखनीय. तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या काही पदाधिकार्‍यांनी सढळ हाताने मदत केल्याचे बोलल्या जाते. या संपूर्ण हिशेबाची जबाबदारी मनपात सक्रिय असलेल्या भाजपातील एका पदाधिकार्‍याकडे सोपविण्यात आली होती. मनपाच्या सत्ता प्राप्तीला एक वर्षांंचा कालावधी उलटून गेला असला तरी ह्यत्याह्ण निवडणुकीतील खर्चाची आर्थिक देवाण-घेवाण अद्यापही सुरूच आहे. काही पदाधिकार्‍यांचा खर्च वसूल होईल, या दाव्यावरून पक्षातील वरिष्ठांनी घुमजाव केल्याने संबंधित पदाधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खर्च वसूल होणे तर दूरच परंतु, कर्जाचा बोजा वाढत असल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहाराचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी काही पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती आहे. या संपूर्ण मुद्यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भाजपची बैठक पार पडली. यामध्ये प्रदेश स्तरावरील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.