शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीशिवाय औषध विकणेे भाेवले; विकतात अनेकजण, सापडले केवळ ३२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST

सचिन राऊत अकाेला : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यातील ३२ औषधी ...

सचिन राऊत

अकाेला : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यातील ३२ औषधी दुकानदारांना चांगलेच भोवले आहे. कारण, एप्रिल ते जुलै या महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील ३२ औषधी विक्री करणाऱ्या दुकानदारांना कारणे दाखवा नाेटीस बजाविण्यात आल्या असून, यापैकी २२ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, १० मेडिकलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

अकाेला जिल्ह्यातील सात तालुक्यांत ७८० पेक्षा अधिक औषधी दुकानदार असून, या दुकानांची वारंवार तपासणी करण्यात येते़. मागील काही महिन्यांत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या पडताळणीत तब्बल ३२ मेडिकल्समध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. या मेडिकल संचालकांना याबाबत खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र, खुलाशाला साजेसे उत्तर न मिळाल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने या औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले असल्याची माहिती आहे. पुढील काळातही या औषधी विक्री केंद्रांवर विशेष लक्ष असून, त्यामध्येही त्रुटी आढळल्यास त्या संचालकांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यामुळे झाले परवाने निलंबित

अन्न व औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ३२ औषधी दुकानदारांना परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटींचे पालन न करणे, स्टाॅकची उपलब्धता किती आहे याचे विवरण नसणे, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड नसणे, डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणे यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील २२ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आहे.

जिल्हयातील १० मेडिकलचे परवाने रद्द

जिल्हयातील अकाेला शहरासह तालुक्याच्या ठिकाणांवर असलेल्या १० मेडिकलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या मेडिकलच्या संचालकांकडे औषधी खरेदी-विक्रीचे बिलच नसणे, रेकाॅर्ड व्यवस्थित न ठेवणे, डाॅक्टरांची चिठ्ठी नसणे यासह विविध कारणे आहेत. रेकॉर्डही समाधानकारक नसल्याने या मेडिकलचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच औषधी विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेक जण बगल देताना दिसतात. अशांवर अन्न व औषध विभागाचा वॉच असून, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ औषधी दुकानदारांना नाेटीस बजावून यापैकी २२ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, दहाजणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

- व्ही. बी. सुलाेचने, सहायक आयुक्त, औषधी विभाग, अकाेला

अशी झाली कारवाई

वर्ष परवाने निलंबित परवाने रद्द

२०२० २८ १२

२०२१ २२ १०

काेराेना काळात सर्दी, अंगदुखीसाठी डाॅक्टरकडे काेण जाणार

काेराेना काळात काेराेनाच्या भीतीमुळे कुणीही डाॅक्टरकडे जाण्यास घाबरत हाेते. त्यामुळे या काळात ओळखीच्या मेडिकलमधून औषधी घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक हाेते. सर्दी, ताप व अंगदुखीसाठी कुणीही डाॅक्टरकडे गेले नसल्याचे वास्तव आहे. या काळात प्रत्येकाने किरकाेळ दुखणे अंगावर काढत औषधी दुकानदारांकडूनच औषधी खरेदी केल्याची माहीती आहे.