शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनीच केला पित्याचा खून

By admin | Updated: November 27, 2015 01:49 IST

संपत्तीच्या वादातून तीन मुलांनीच खून केल्याची माहिती.

रिसोड : तालुक्यातील मोठेगाव येथील ६५ वर्षीय दत्तराव निंबाजी तिरके यांचा अपघाती मृत्यू नसून, संपत्तीच्या वादातून तीन मुलांनीच त्यांचा खून केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. गुरूवारी पोलिसांनी मृतकाच्या तीनही मुलांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. मोठेगाव रस्त्यावर २५ नोव्हेंबरला दत्तराव तिरके यांचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणी घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. मृतकाच्या अंगावरील जखमा व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या चर्चेनुसार ठाणेदार एम.ए. रउफ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिगंबर कांबळे यांनी तपास केला. मृतकाच्या मुलांची कसून चौकशी केली असता, खून केल्याची कबुली दिली. संपत्ती व शेतीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मुलांनी वडिलाला शेतामध्ये नेले आणि दारू पाजल्यानंतर रुमन्याने मारुन खून केला. वडील मृत पावल्याची खात्री पटल्यानंतर मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. संपत्ती व शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याची कबुली मुलांनी दिल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले. याप्रकरणी फिर्यादी दिगंबर कांबळे यांच्या चौकशीनुसार तीन मुले रवी दत्तराव तिरके, किशोर दत्तराव तिरके, किशन दत्तराव तिरके यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३0२, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली.