शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेती कर्जाधारित न होता मूल्याधारित व्हावी- पालकमंत्री

By admin | Updated: September 5, 2015 01:49 IST

महाराजस्व विस्तारित समाधान शिबिर; लवकर वीज जोडणी देण्याचे शासनाचे प्रयत्न.

मूर्तिजापूर : शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने या बाबीची गंभीर दखल घेण्यात आली असून, लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे प्रयत्न आहे. शेतकर्‍यांची शेती ही कर्जाधारित न होता मूल्याधारित व्हावी असाच शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. मूर्तिजापूर येथे ४ सप्टेंबर रोजी आयोजित महाराजस्व विस्तारित समाधान शिबिरप्रसंगी ते बोलत होते.या विस्तारित समाधान योजना शिबिराच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते तर आ. हरिष पिंपळे, पं.स. सभापती शुभांगी खंडारे, नगरसेवक गोपी ठाकरे, नगराध्यक्ष पवन अव्वलवार, जि.प. सदस्य रवींद्र गोपकर, देवानंद गणोरकर, पं.स. उपसभापती उमेश मडगे, नगरसेविका स्नेहा नाकट, पं.स. सदस्य स्मिता गावंडे, प्रभारी जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह, अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन निपाणे, आत्मा प्रकल्प संचालक तळवी, मूर्तिजापूरचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे,बाश्रीटाकळीचे तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार वैभव फरताडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिरात महिला व बालकल्याण विभागाच्या योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.शाहीर मधुकर नावकार आणि श्याम कोल्हाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांंना धनादेश वितरित करण्यात आले. पालकमंत्री, आमदारांनी केले शिबिराचे 'समाधान'विस्तारित समाधान शिबिरात मूर्तिजापूर व बाश्रीटाकळी तालुक्यातील एकूण २८४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारकर्त्यांंचे म्हणणे ऐकून स्थानिक पातळीवरील तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात आला. तसेच काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले.पालकमंत्री डॉ.रणजित पाटील आणि आमदार हरिष पिंपळे यांनी दिवसभर,तसेच सायंकाळी उशिरापर्यंंत प्रत्येक तक्रारकर्त्यांंचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्यसमाधानह्ण शिबिर यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये उमटल्या.

विविध स्टॉलद्वारे दिली योजनांनी माहिती

समाधान शिबिरप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते.मूर्तिजापूर नगरपरिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, महावितरण, कृषी विभाग, भूमी अभिलेख, सर्व शिक्षा अभियान अशा अनेक स्टॉल्समधून योजनांची माहिती देण्यात आली.