शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबविणार प्रबोधनात्मक उपक्रम!

By admin | Updated: January 5, 2016 01:54 IST

माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांची माहिती.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांमार्फत योजना राबविल्या जात आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने देखील हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष पावले उचलण्याचे ठरविले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सोमवारी दुपारी जिल्हा माहिती कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली. दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा विचार करणार्‍या शेतकर्‍यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजना व निर्णय शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी कसोशीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. या प्रयत्नांना यशाची जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नवोपक्रम हाती घेतला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने येत्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हय़ातील ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकर्‍यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कीर्तन, भारूड, पथनाट्ये, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची व्याख्याने व चित्ररथाच्या माध्यमातून माहितीपट दाखविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्याही जाणून घेतल्या. पत्रपरिषदेला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, शौकतअली मिरसाहेब, सुधाकर खुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.