शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मिळणार सौरशक्ती कृषिपंप !

By admin | Updated: September 10, 2015 01:50 IST

संरक्षित ओलितासाठी शासनाचा उपक्रम; अनुदान तत्त्वावर होणार वितरण.

अकोला: पाणी आहे, पण वीज नाही, अशी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची अवस्था आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून शेतकर्‍यांना सौरशक्ती कृषिपंप उपलब्ध करू न देण्याचे नियोजन केंद्रीय कृषी व शेतकरी कामगार मंत्रालयाने नियोजन केले असून, राज्य शासनाच्या माध्यमातून हे सौरशक्ती पंप शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करू न दिले जाणार आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी, सहकार, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाने शेती यांत्रिकीकरणावर भर दिला असून, शेतकर्‍यांपर्यंत ही यंत्रे पोहोचविण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. सौरशक्ती हा त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. लाखो शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत अद्याप वीज पोहोचली नाही. कृषिपंपाचा अनुशेष वाढला आहे. यावर कायमस्वरू पी तोडगा काढण्यासाठी शासनाने सौरशक्ती कृषिपंपाची योजना आखली आहे. सौरशक्ती पंप महागडे असून, हे खरेदी करणे शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर असल्याने हे कृषिपंप शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करू न देण्याचे ठरविले आहे. लाखो शेतकर्‍यांनी शेततळे, बोअरवेल, विहिरी शेतात केल्या आहेत. पण, वीज नसल्याने ते पिकाला पाणी देऊ शकत नाहीत किंवा पावसाचा खंड पडला तरी शेतकर्‍यांना विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्य़ादेखत पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांकडे पाण्याची व्यवस्था व वीजही उपलब्ध आहे; परंतु भारनियमनामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. या महागड्या सौरशक्ती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकर्‍यांना परवडेल, या अनुषंगाने शासनाने योजना आखली असून, सौरशक्ती कृषिपंप शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करू न देण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्य शासनाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सौरशक्ती पंपामुळे दुर्गम भागात राहणार्‍या शेतकर्‍यांना मोठा लाभ घेता येणार आहे. आता तर शासनाने मागेल त्याला विहीर व शेततळे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सौरशक्ती कृषिपंपाची गरज वाढणार आहे. महाराष्ट्र महाऊर्जा विकासतर्फे या सौरशक्ती कृषिपंपाचे परीक्षण केले जात आहे.