शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतक-यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 23:35 IST

गत चोविस तासात लोणार, चिखली तीन तर खामगाव, रिसोड व अहेरी येथे केवळ एक सें.मी. पाऊस.

अकोला: निम्मा जून संपला असून, अद्याप दमदार मॉन्सूनचे आगमन झाले नसल्याने बळीराजासह सगळ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीस तोंड देत असलेल्या जिल्ह्यातील जनतेला हवामान खात्याच्या चांगल्या पावसाच्या अंदाजाचा प्रत्यय अजूनपर्यंत आलेला नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा खरीप हंगामातील पिकांचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती असल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, मागील चोविस तासात विदर्भात बुलडाणा जिल्हय़ात चिखली, लोणार येथे तीन, खामगाव व अहेरी येथे एक सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दररोज हवामान खात्याकडून पावसाचे अंदाज वर्तविले जात आहेत; मात्र सगळेच खोटे ठरत असल्याने सगळ्यांचाच विशेषत: बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. दोन दिवस आलेल्या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे; परंतु पुन्हा रविवारी पावसाने दडी मारल्याने बळीराजावरचे संकट वाढले आहे. एक दिवस येऊन पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या काळजाचे ठोके वाढत आहेत. मुक्या जनावरांचा चारा कधीचाच संपला असून, चारा विकत घेणेही आवाक्याबाहेरचे झाले आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीस कापूस, सोयाबीन तसेच मूग, उडीद, तूर अशा कडधान्यांची पेरणी करून, त्यानंतर इतर पिकांसाठी जमीन मोकळी केली जाते; मात्र पाऊस लांबत असल्याने कडधान्य उत्पादनावर व पुढील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस उत्तरेकडे मागील २४ तासात २१ जून रोजी सकाळी ८.३0 वाजतापर्यंत नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा आणखी उत्तरेकडे सरकली आहे, तसेच मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग,पूर्व मध्यप्रदेश व बिहार, पश्‍चिम मध्यप्रदेशचा बहुतांश भाग, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश, संपूर्ण जम्मू-काश्मीर व पश्‍चिम उत्तरप्रदेशच्या भागात मोसमी पावसास सुरुवात झाली आहे.