शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढला !

By admin | Updated: July 24, 2015 00:57 IST

३१ जुलै शेवटचा दिवस; व-हाडातील शेतकर्‍यांना मिळाले गतवर्षीचे २७९ कोटी; १४२ कोटीची प्रतीक्षा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी आतापर्यंत ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; परंतु पावसाची अनियमितता बघता शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्यावर जोर दिला आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. दरम्यान, पीक विम्यापोटी आलेले मागील वर्षाचे १४२.२ कोटी शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.यंदा पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांना पीक विम्याची ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यात हवामानावर आधारित पीक विम्याचे ७६.४0 कोटी मिळाले आहेत; पण रक्कम मिळण्यास होणार्‍या दिरंगाईमुळे आतापर्यंत केवळ २७९.0६ कोटी रूपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळाली असून, १४२.0२ कोटी रुपये मिळण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. या पाचही जिल्हय़ांमध्ये आतापर्यंत सरासरी २३३ मि.मी. एवढाच पाऊस झाल्याने पुढे पाऊस येईल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. असे असले तरी वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे. २१ जुलैपर्यंत पश्‍चिम विदर्भातील २७ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्याकडे कल वाढला आहे. *४२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मागील वर्षाचे ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. यात अकोला जिल्हय़ाला १0९ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहेत. बुलडाणा जिल्हय़ाला ९१ कोटी, वाशिम ५७ कोटी ९९ लाख, यवतमाळ ७८ कोटी ९0 लाख, तर अमरावती जिल्हय़ाला ८३ कोटी ४५ लाख रुपये नुकतेच मिळाले आहेत; पण यातील १४२.२ कोटी रुपये थकले आहेत.