शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयातच शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST

कारंजातील घटना; रोहित्र बदलण्याची मागणी.

कारंजा लाड (जि. वाशिम) : नादुरूस्त विज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना, वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकर्‍याने विज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी कारंजा येथे घडली. कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापूरे) येथील शेतकर्‍यांनी उच्च क्षमतेचे नविन रोहीत्र बसविण्यासाठी येथील वीज कंपनीकडे २0१३ मध्ये अर्ज केला होता. या ठिकाणी असलेले पूर्वीचे रोहित्र कमी क्षमतेचे असून, याच रोहित्रावरून अनेक शेतकरी वीज घेत असल्याने अतिरिक्त दाब येऊन या रोहित्रात वारंवार बिघाड येत होता. त्यामुळे विजपुरवठय़ाअभावी पिकांना पाणी देणे शेतकर्‍यांना शक्य होत नव्हते. हे रोहित्र बदलून नवे आणि अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली होती; परंतु शेतकर्‍यांच्या या मागणीची दखल विज वितरणच्या अधिकार्‍यांकडून घेण्यात येत नव्हती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी येथील जुन्या रोहित्रात पुन्हा बिघाड झाल्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले. परिणामी पिके सुकू लागली. या स्थितीबाबत शेतकर्‍यांनी वीज कंपनीच्या संबंधित अभियंत्याना अवगत केले. त्यानंतरही शेतकर्‍यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे खेर्डा (जिरापुरे) येथील संतप्त शेतकर्‍यांनी गुरूवारी येथील विज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकर्‍यांची विज कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरू असतानाच, संजय गागरे नामक शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकर्‍यांनी लगेच त्यांच्या हातातील विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.