शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बाजारात शेतक-यांनी विकला ५२ लाख क्विंटल कापूस

By admin | Updated: November 28, 2015 02:19 IST

सीसीआयची २६ खरेदी केंद्रांद्वारे ७१ हजार क्विंटल कापूस खरेदी.

अकोला : राज्यातील शेतकर्‍यांनी खासगी बाजारात आतापर्यंत ५२ लाख क्विंटलवर कापूस विकला असून, पणन महासंघाकडे ७४ हजार ८९५, तर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) नुकत्याच सुरू केलेल्या २६ कापूस खरेदी केंद्रांवर ७१ हजार ५५७ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. मागील वर्षी सीसीआयने देशभरात ३३५ व महाराष्ट्रात ७0 कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. त्याद्वारे ८६.९0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. पणन महासंघाने ११५ खरेदी केंद्रे सुरू केली होती. यावर्षी सीसीआयने खरेदी केंद्रे सुरू करण्यास विलंब केला असून, आतापर्यंत केवळ २६ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने ७0 कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. कापूस उत्पादक क्षेत्र आणि सीसीआय व पणन महासंघाची खरेदी केंद्रे अपुरी पडत आहेत. तथापि, सीसीआय स्वत: केंद्र उघडत नसून, आम्हालाही परवानगी देत नसल्याचा आरोप पणन महासंघाच्या वरिष्ठांनी केला आहे. दरम्यान, कापसाचे हमी दर प्रति क्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असल्याने शेतकर्‍यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्यात अनेक तालुक्यांमध्ये अद्याप पणन महासंघ व सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने शेतकर्‍यांचा कापूस खेडा पद्धतीने खरेदी केला जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात कापसाला बोनस किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून दरवाढीची घोषणा होईल, यासाठी अनेक शेतकर्‍यांनी कापूस अद्याप विकलेला नाही. सामाजिक सुरक्षितता म्हणून कापूस उत्पादक शेतकर्‍यांची दखल घेतली जाईल का, याकरिता श्ेतकर्‍यांचे लक्ष विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे. मागील वर्षी ११५ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. यावर्षी आमची तेवढीच केंद्रे सुरू करण्याची तयारी आहे. सीसीआयचे आम्ही अभिकर्ता असल्याने त्यासाठीची परवानगी हवी असल्याचे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी स्पष्ट केले.