लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उचलले असून, दूध, भाजीपाला, शेतमाल बाजारात न विकण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून हा संप आहे. यामुळे शहरातील दूध, भाजीपाला व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या संपात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. गुरुवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी जेरीस आला आहे. या गर्तेतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची गरज आहे; पण शासनाचे धोरण शेतकरीविरोधी असून, विदेशातून धान्य, कडधान्य आयातीचे प्रकार सुरू आहेत. फळे, भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व बिनव्याजी कर्ज पुरवठा आदीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचे किसान क्रांतीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.यामुळे शहरासह अकोला जिल्ह्यात दूध, भाजीपाला व अन्नधान्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी संघटना, जागर मंच, किसान जागरण मंच, भूमिपुत्र, ईपीएस-९५, युवाराष्ट्र आदी संघटना संपात सहभागी झाल्या असून, भारत कृषक समाज संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे विजय काकडे, प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके, जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, अरुण बोंडे, राजू वानखडे, शेतकरी नेते प्रकाश बोनगिरे, विजय लोडम, देवीदास बांगड, पुंडलिक भारंबे, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश जोगळे, प्रा.पी.एम. पाटील आदी या संपात सहभागी आहेत.शेतकऱ्यांच्या संपास शेतकरी संघटनेचा पाठिंबाअकोला : जिल्ह्यातील शेतकरी १ जूनपासून संपावर जात असून, या संपास शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, भाजीपाला अडतदार, व्यापारी, दूध उत्पादक शेतकरी, दूध डेअरी संचालक, भाजी विक्रेते, शेतमाल वाहतूकदार यांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी केले आहे. संपाला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत. भाजीपाला, दूध, अन्नधान्य बाजारात न पाठविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.- मनोज तायडे, शेतकरी जागर मंच.पश्चिम महाराष्ट्रात संपाची तीव्रता अधिक राहील. आपल्याकडेही शेतकरी संपात सहभागी होणार आहेत. या संपाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.- प्रकाश मानकर, चेअरमन, महाराष्ट्र राज्य कृषक समाज.कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवावी, यासाठी पत्र दिले आहे. दूध डेअरीलासुद्धा संपाची कल्पना देण्यात आली आहे. शेतकरी संपात सहभागी होणार आहेत.- सुरेश जोगळे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, अकोला.पश्चिम महाराष्ट्रात या संपाची तीव्रता असेल. आपल्याक डे शेतकरी संपात सहभागी होतील. बाजारात माल देणार नाही.- टिना देशमुख, जिल्हाअध्यक्ष, शेतकरी संघटना, महिला आघाडी, अकोला.पश्चिम महाराष्ट्रात संपाची तीव्रता अधिक असेल, आपल्या भागातही शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत.- ज्ञानेश्वर गावंडे, म्हैसांग.
शेतकऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार!
By admin | Updated: June 1, 2017 01:27 IST