मुंडगाव : मुंडगाव परिसरात २२ व २३ जुलै या सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार अतवृष्टीमुळे परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे ज्या शेतात धुरा बांधबंदिस्ती केली आहे त्या शेतात पावसामुळे तलाव साचले असून पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालयातार्फत मुंडगाव, अल्यारपूर, वणीवारुळा, सोनबर्डी या परिसरात धुरा बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने झालेल्या बांधबंदिस्तीमुळे शेतकर्यांच्या शेतात पाणी साचले असून पिके पूर्णत: पाण्याखाली बुडाली आहेत. त्यामुळे महागीचे बी-बियाणे वापरून केलेला खर्च पाण्यात जात असून शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडल असून हवालदिल झाले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची मोक्का पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतात पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल
By admin | Updated: July 29, 2014 20:17 IST