शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले

By admin | Updated: November 2, 2015 02:55 IST

शुक्रवारी देणार ठिय्या; जिल्हाभरातील शेतकरी होणार सहभागी.

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून जेरीस आला आहे. यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके हातची गेली, तर सोयाबीन, कपाशी व तुरीचे उत्पादन घटले आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बी हंगामाचीही शक्यता धूसर आहे. शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी जागर मंच शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उधार-उसनवारी व कर्ज घेऊन पेरणी केली; परंतु अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. मूग, उडिदाची पिकं गेली. सोयाबीनचा उताराही एकरी तीन ते चार क्विंटल एवढा येत आहे. यातून पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल झालेला नाही. परिस्थिती एवढी भीषण असतानाही शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक जाहीर केली. अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी पिचून गेले आहेत. अनेक शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असताना शासनाचे त्याकडे फारसे लक्ष नाही. दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना पैसा नसल्यामुळे शेतकर्‍यांनी बाजारपेठेकडे पाहिलेदेखील नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन जागर मंचने जिल्हाधिकार्‍यांना २७ ऑक्टोबर रोजी दिले होते. याच मागणीच्या अनुषंगाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत. या आंदोलनात मनोज तायडे, गजानन फुंडकर, दिनकरराव वाघ, प्रशांत नागे, ज्ञानेश्‍वर गावंडे, गोपाळराव काठोळे, बाळासाहेब वसू, शेख गणी, शरद देशमुख यांच्यासह कौलखेड, विराहित, म्हैसांग, रामगाव, अन्वी मिर्झापूर, पळसो, सुकळी, सांगळूद, डोंगरगाव मासा, बोरगाव मंजू, आपातापा येथील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.