शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदात्यांसाठी शेतकरी पुत्रांचा अन्नत्याग!

By admin | Updated: March 20, 2017 02:47 IST

शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी, स्वाभिमानासाठी अभिनव आंदोलन.

अकोला, दि. १९- स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी राज्यभर शेतकरी प्रश्नांवर मंथन करण्यासाठी व शेतकरी समस्यांचे मूळ असलेले शेतकरीविरोधी कायदे व धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी अकोल्यातील गांधी जवाहर बागेसमोर शेतकरी पुत्रांनी एकदिवसीय अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन केले. देशभरात झालेल्या लाखो शेतकर्‍यांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेती व शेतकर्‍यांची एकंदर दशा आणि दिशा यावर मंथन करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी व शेतकरीपुत्र या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हाचे अध्यक्ष अविनाश पाटील नाकट यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हे अन्नत्याग आंदोलन शेतकरीविरोधी कोडग्या व्यवस्थेवर ओढलेला आसूड ठरावा, या निमित्ताने शेती व शेतकर्‍यांची दुरवस्था करणार्‍या धोरणांविरोधात ठिणगी उठावी व शेती व शेतकर्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, हक्काची संपूर्ण कर्जमुक्ती व सर्व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात येऊन खर्‍या अर्थाने बळीचे राज्य यावे, असे विचार या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले.अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी पुत्रांनी उपस्थिती लावली. बळीराजाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्या व प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले. अन्नत्याग आंदोलनासाठी डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, डॉ. गजानन नारे, किशोर बळी, प्रकाश मानकर, भाई रजनीकांत, प्रशांत बुले, मराठा सेवा संघाचे अशोक पटोकार, प्रदीप चवरे, डॉ. विजय जाधव, पंकज जायले, इंदुमती देशमुख, वनिता गावंडे, अविनाश पाटील, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष खुमकर, युनूस खान, सुरेश राऊत, प्रा. दिवाकर पाटील, प्रा. दिनकर पाटील, सुनील जानोरकर, राजेश वाघोडे, दीपक नकासकार, आकाश दांदळे, चाँद खा व अकोला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतूनही शेतकर्‍यांची उपस्थिती होती. संचालन धनंजय मिश्रा व आभारप्रदर्शन आकाश दांदळे यांनी केले.अकोट येथेही अन्नत्यागअकोट येथे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांना कवितेतून श्रद्धांजली देण्यात आली. शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या.