शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या फसवणुकीचा डाव उधळला!

By admin | Updated: December 16, 2015 02:07 IST

इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर ; ‘रिमोट’ने कापूस कमी मोजण्याचा प्रयत्न.

चंद्रशेखर ठाकरे / पिंजर(जि. अकोला): इलेक्ट्रॉनिक काट्याने रिमोटच्या माध्यमातून कापूस कमी मोजून शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा डाव शेतकर्‍यांच्याच सतर्कतेमुळे मंगळवारी पाराभवानी परिसरात उधळण्यात आला. शेतकर्‍यांना तफावतीची रक्कम मिळाल्याने या प्रकरणावर पडदा पडला. बाश्रीटाकळी येथील रहिवासी असलेला व्यापारी कापूस खरेदीसाठी पाराभवानी परिसरात आला होता. यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे कपाशीसह इतरही पिकांना फटका बसला. काही ठिकाणी शेतकर्‍यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. पिकांसाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी कशीबशी पिकं जगविली होती. अनेकांचा तर उत्पादनखर्चही निघाला नाही. अशातच आता व्यापारी कापूस खरेदी करताना शेतकर्‍यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला. गत काही दिवसांपासून व्यापारी कापूस खरेदीसाठी गावोगावी फिरत आहेत. बाश्रीटाकळी येथील एक व्यापारीही पाराभावानी परिसरात मंगळवारी आला. त्यामुळे शेतकरीही कापूस घेऊन आले. व्यापारी इलेक्ट्रॉनिक काट्याने कापूस मोजत होता; मात्र कापसाची वेचणी आणि आता विक्रीच्या वेळी केलेल्या कापसाच्या वजनात तफावत असल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी मोजण्याच्या प्रक्रियेवर नजर ठेवली. व्यापारी रिमोटच्या साहाय्याने माप (वजन) कमी करीत असल्याचे त्यांना आढळून आले. ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थ गोळा झाले. त्यामुळे व्यापार्‍याने तेथून पळ काढला. या प्रकाराची माहिती बाश्रीटाकळी येथील काही व्यापार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाराभवानी येथे धाव घेऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. चर्चेअंती शेतकर्‍यांना तफावतीची रक्कम देण्यात आली.