शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ‘अतिवृष्टी’च्या मदतीतून होणार बाद!

By admin | Updated: June 19, 2017 04:38 IST

पीक विमा काढलेल्या शेतक-यांवी क्षेत्र आणि शेतकरी वगळून शासनाने मागितली माहिती.

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी वादळी वार्‍यासह अतवृष्टीमुळे पीक नुकसानभरपाईपोटी जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक विमा काढलेले शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र वगळून निधी मागणीची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा काढणारे जिल्हय़ातील शेतकरी ह्यअतवृष्टीह्णच्या मदतीतून बाद होणार आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर २0१६ या चार महिन्यांच्या कालावधीत वादळी वार्‍यासह अतवृष्टीमुळे जिल्हय़ातील शेती पिके आणि फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हय़ातील अकोला, बाळापूर, बाश्रीटाकळी व पातूर या चार तालुक्यांत २ हजार १२८ शेतकर्‍यांचे १ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल गत ८ मे २0१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर वादळी वार्‍यासह अतवृष्टीमुळे जिल्हय़ातील पीक नुकसान झालेले शेतकरी आणि शेतीच्या क्षेत्रापैकी गतवर्षी पीक विमा काढलेले शेतकरी आणि पीक नुकसानाचे क्षेत्र वगळून, किती शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आणि किती शेतकर्‍यांनी पीक विमा काढला नाही, याबाबत अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी लागणार्‍या निधीची माहिती सादर करण्याचे निर्देश शासनाचे मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी १२ जून २0१७ रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. त्यानुसार वादळी वार्‍यासह अतवृष्टीमुळे पीक नुकसानभरपाईपोटी शासनाकडून अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार्‍या मदतीतून पीक विमा काढलेले शेतकरी बाद होणार आहेत.माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू!शासन आदेशानुसार, गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टीमुळे जिल्हय़ात पिकांचे झालेले नुकसान त्यापैकी पीक विमा काढलेले शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र तसेच पीक विमा न काढलेले शेतकरी व शेतीचे क्षेत्र आणि पीक विमा न काढलेल्या अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी लागणारा मदत निधी यासंदर्भात माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे.