शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: November 11, 2015 02:04 IST

२५ हजार ८0१ शेतक-यांनी काढला होता विमा

सायखेड (अकोला): गतवर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी काढलेल्या विम्याचा लाभ जिल्ह्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादन घटले. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पैसा कोठून आणावा आणि संसाराचा गाडा कसा हाकावा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विम्याचा लाभ मिळाला असता तर थोडीशी का होईना विवंचना कमी झाली असती, अशी भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांना शासनाच्या आर्थिक मदतीसह खरीप हंगामासाठी काढलेला पीक विमा मिळाला होता. शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी शेती तयार करून मागील दुष्काळाची झीज भरून काढण्यासाठी पेरणी केली; मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा रब्बी पिकांना फटका बसला. पिके काढणीला घेताच वादळी वार्‍यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व इतर पिके भुईसपाट झाली. गतवर्षी रब्बी हंगामात अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांनी रब्बी पीक विमा काढून पिकाला संरक्षण दिले होते. यंदा जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारल्याने पिके सुकली. त्यानंतर काही ठिकाणी अतवृष्टीही झाली. त्यामुळे उत्पादन प्रचंड घटले. बहुतांश शेतकर्‍यांचा तर मशागत आणि पेरणीचा खर्चही निघालेला नाही; मात्र आता गतवर्षीचा रब्बी पीक विमा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. शासनाने तातडीने विमा मंजूर होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.