शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागनिहाय आरक्षणाची सूचना होणार प्रसिद्ध

By admin | Updated: October 4, 2016 02:32 IST

अकोला मनपात सोमवारी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम करण्यात आली.

अकोला, दि. ३- महापालिका निवडणुकीसाठी जातीनिहाय प्रवर्गाच्या आरक्षणाची सूचना उद्या (मंगळवार) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाईल. पूर्वतयारी म्हणून सोमवारी महापालिकेत अधिकार्‍यांच्या दालनात आरक्षण सोडतीची रंगीत तालीम करण्यात आली.महापालिकेची फेब्रुवारी २0१७ मध्ये निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आयुक्त अजय लहाने यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपवली आहे. प्रभाग पुनर्रचनेचे काम आटोपल्यानंतर आता प्रशासनाने आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे होईल. आजरोजी ३६ प्रभागांत ७३ नगरसेवक आहेत. मनपात समाविष्ट झालेल्या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ गृहीत धरून पालिका प्रशासनाने प्रभागांची पुनर्रचना केली. यामध्ये चार नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग, या प्रक्रियेनुसार २0 प्रभागांची रचना करण्यात आली. २0 प्रभागांमधून ८0 नगरसेवक निवडून येणार आहेत. अर्थातच यामध्ये नियमानुसार ५0 टक्के महिलांचे आरक्षण असून एकूण ८0 जागांसाठीदेखील लोकसंख्येचे निकष व जातीनिहाय प्रवर्गाचे निकष लक्षात ठेवून आरक्षण काढल्या जाईल. त्यासाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ४ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सूचना प्रसिद्ध केल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतसाठी पूर्वतयारी म्हणून सोमवारी मनपात उपायुक्त समाधान सोळंके यांच्या दालनात रंगीत तालीम करण्यात आल्याची माहिती आहे.नकाशे अंदाज चुकविणार ऑक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्याच दिवशी मनपात प्रभाग पुनर्रचेनेचे नकाशे प्रसिद्ध केले जातील; परंतु नकाशांमध्ये त्या-त्या भागाचा नावानिशी उल्लेख नसल्याने इच्छुकांना अंदाज-आडाखे जुळवण्यासाठी डोके खाजवावे लागेल, हे निश्‍चित.पूर्वतयारीसाठी आयोगाचे निर्देशआरक्षणाची सोडत काढण्यापूर्वी किमान दोन वेळा रंगीत तालीम करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून रंगीत तालीम करण्यात आली. लोकसंख्येचा उल्लेख असावा!आरक्षणाची सोडत ही संबंधित जातनिहाय प्रवर्गानुसार निघणार आहे. अर्थातच, त्या-त्या प्रभागातील जातीनिहाय लोकसंख्येची माहिती नागरिकांना उपलब्ध असणे अपेक्षित आहे; मात्र ७ ऑक्टोबरला नकाशे प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये लोकसंख्येचा उल्लेख केला जाणार नसल्याची माहिती आहे.