शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत, पीक कर्ज वाटप योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे ...

अकोला: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत, पीक कर्ज वाटप योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील बॅंकांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीआंशू, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक अभिजित चन्दा, विदर्भ ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुबोध बन्नोरे, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, युनियन बॅंकेचे मुख्य प्रबंधक अतुल मोहोड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे महाव्यवस्थापक सुधाकर झळके आदी उपस्थित होते.

गत वर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६ हजार ४३४ शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यात आला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ५४६ शेतकऱ्यांना ५९३ कोटी ३३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तथापि, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पीक कर्ज योजनेचा लाभ पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले. खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाची मुदत १५ जुलैपर्यंत असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

पीक कर्ज व्याज सवलत योजनेस

३० जूनपर्यंत मुदतवाढ!

ज्या शेतकऱ्यांनी २०२०-२१ या वर्षाकरिता अल्पमुदती पीक कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत केंद्र शासनाने वाढविली असून, तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी केंद्र शासनाची व्याज सवलत योजना लागू राहणार आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत सन २०२०-२१ मध्ये वाटप केलेल्या खरीप पीक कर्ज परतफेडीस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत पीक कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्ज घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था व्ही. डी. कहाळेकर, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तारेणीया यांनी या बैठकीत केले.