शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!

By admin | Updated: July 5, 2017 00:51 IST

जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ कामे पूर्ण

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात ३११ गावांमध्ये प्रस्तावित ३११ उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत गत उन्हाळ्यात विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी ३११ गावांमध्ये १९८ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित १३९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची स्थिती आहे.पावसाळ्यातही अनेक गावांत पाणीटंचाई!पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पाणीटंचाईची परिस्थिती कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.आराखडा २५ कोटींचा; कामे ३८ लाखांची!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या १९८ उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला; मात्र अपेक्षित खर्चाच्या तुलनेत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ५९ उपाययोजनांच्या कामांवर केवळ ३८ लाख ४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.