शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

दाजिर्लिंगची अनुभूती ‘वान’मध्ये

By admin | Updated: August 1, 2014 02:20 IST

अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळे.

डॉ. किरण वाघमारे / अकोलाभारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दाजिर्लिंगचा अनुभव कोणाला नकोसा असणार आहे; परंतु दाजिर्लिंगला जाणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. पुरेसी फुरसत आणि आर्थिक परिस्थिती असली तरच दाजिर्लिंग जाणे शक्य आहे; परंतु दाजिर्लिंगसारखाच अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या गावापासून जवळच वान आहे. अकोल्यापासून अवघ्या ७५ कि.मी. वर असलेले वान पर्यटनस्थळ आ पल्याला दाजिर्लिंगचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. आकोटपासून ३0 कि.मी. अंतरावर असलेल्या वानला निसर्गाची भरपूर श्रीमंती लाभली आहे. सातपुड्याच्या डोंगरदर्‍यांमध्ये वसलेल्या वानची समुद्रसपाटीपासून उंची ४३२ मीटर आहे. २११ चौरच कि.मी. परिक्षेत्रात पसरलेले वान अभयारण्य पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनू पाहत आहे. वानला जायचे तर खरी मजा रेल्वे प्रवासातच आहे. अकोला रेल्वेस्थानकावरून वानकडे जाण्यासाठी मीटरगेज रेल्वे आहे. छोट्या गाडीने पावसाळ्यात प्रवास करताना सर्वदूर पसरलेला हिरवा निसर्ग, भुरभुर पडणारा पाऊस, मध्येच दिसणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि डोंगराच्या पाय थ्याशी असलेली छोटी-छोटी गावे पाहिली की, आपण दाजिर्लिंगच्या रेल्वेत प्रवास करीत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. अकोला-खंडवा रेल्वे मार्गावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वानला जाण्यासाठी मोटारीचादेखील मार्ग आहे; परंतु रेल्वेने जाण्याची मजा काही औरच. वानरोड रेल्वेस्थानकदेखील निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. या छोट्याशा स्टेशनवर उतरल्याबरोबर आपल्या मनाला आनंद मिळतो. स्टेशनच्या चारही बाजूला हिरव्यागार टेकड्या पहावयास मिळतात. वानला जाणारा रेल्वे मार्ग दर्‍याखोर्‍यातून घाट पार करीत जातो. या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा मार्ग इंग्रजी चारच्या आकड्याप्रमाणे आहे. वानचा हा चारचा आकडा सर्वदूर प्रसिद्ध आहे. अशाप्रकारे वळण मार्ग असलेला हा जगातील एकमेव रेल्वेमार्ग आहे. हा रेल्वेमार्ग अनुभवण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने वानला येतात. वान रेल्वे स्थानकावरून पाऊलवाटेने थोडेसे वर चढले की, वान पर्यटन संकुलाजवळ आपण जाऊन पोहोचतो. येथे पर्यटकांना थांबण्यासाठी आकोट वनविभागाच्यावतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. नैसर्गिक जीवनाचा आनंद घेता यावा, याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या झोपड्या येथे पर्यटकांसाठी उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्या संपूर्णपणे माती व लाकडाचा उपयोग करून बांधण्यात आल्या आहेत. भिंतीवरील नक्षीकाम पूर्णपणे आदिवासी कलाशैलीचे दर्शन घडवि ते. झोपड्याशिवाय तीन कापडी तंबू पर्यटकांसाठी येथे आहेत. एकाचवेळी १२ लोक राहू शकतील, असा मोठा तंबूदेखील येथे आहे. भोजनाचीही व्यवस्था आधी सांगितल्यास येथे केली जाते. वाचनप्रेमींसाठी येथे ग्रंथालय आहे, लाकडापासून बनविलेला मीटिंग हॉल, वन व वन्य जीवासंदर्भात माहिती जाणून घेण्याकरिता, माहितीपट पाहण्याकरिता नैसर्गिक थिएटर, प्राणी रक्षणासाठी उंच मनोरा, फुलझाडांनी बहरलेली छोटी पण सुंदर बाग येथे निर्माण करण्यात आली आहे. वानमध्ये पर्यटकांना आनंद देण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. रॅपलिंग करू इच्छिणार्‍यांसाठी उंच कडा आहे, दुधाप्रमाणे शुभ्र पाणी असणारे धबधबे आहेत, खळखळ वाहणारी वान नदी, उंच व हिरव्या वनराईने नटलेल्या टेकड्या, रंगबिरंगी फुलपाखरांचे उडणारे थवे, पक्ष्यांचे मंजुळ आवाज, थंड पण आल्हाददायक वारा आणि सरसर बरसणार्‍या श्रावण सरी हे सर्व धुंद करणारे वा तावरण मनाला मोहून टाकतं. वानला गेल्यावर संपूर्ण थकवा नष्ट होऊन शरीर आणि मन ताजेतवाने होते. तर मग पावसाळ्यातील एक दिवस वानला जाऊन यायला काय हरकत आहे.