शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी करणा-या अधिका-यांची हकालपट्टी करा!

By admin | Updated: December 11, 2014 01:07 IST

अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

अकोला: नगरसेवकांविरुद्ध द्वेषभावनेतून कारवाई करणारे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारून संपूर्ण शहरात मनमानी करणार्‍या मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची चौकशी करून तत्काळ बदली करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली. नागपुरात भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी दोन्ही अधिकार्‍यांच्या मनमानीचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर नगरसेवकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. प्रभागातील समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. चिंचोलीकरांच्या वागणुकीचा सर्वच नगरसेवकांना त्रास होत असल्याने त्यांना कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश अनेकदा जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी दिल्याचा मुद्दा आमदार गोवर्धन शर्मा यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. चिंचोलीकरांच्या वागणुकीत सुधारणा न होता, उलट त्यांनी सूडभावनेतून नगरसेवकांना त्रास देणे सुरू केले. नगरसेवकांचा सतत होणारा अपमान व शहरात मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा लक्षात घेता, उपायुक्त चिंचोलीकर यांची तत्काळ बदली करून त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली.