शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरण्यात उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर आघाडीवर!

By admin | Updated: August 14, 2014 02:02 IST

अकोला मनपाचा मोर्चा ‘क्रिम एरिया’तील रहिवाशांकडे वळला असून २.५१ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली.

अकोला : अवैध नळ जोडणीच्या माध्यमातून पाण्याची चोरी करणार्‍या स्लम एरियातील नागरिकांविरोधात फौजदारी दाखल केल्यानंतर मनपा प्रशासनाचा मोर्चा आता ह्यक्रिम एरियाह्णतील रहिवाशांकडे वळला. गोरक्षण रोड परिसरातील उद्योजक, व्यावसायिक व डॉक्टरांच्या निवासस्थानी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अवैध नळ शोध मोहीम राबवली असता, उच्चभ्रू व आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे सुशिक्षित नागरिकसुद्धा पाण्याची सर्रास चोरी करीत असल्याचे बुधवारी कारवाईदरम्यान समोर आले. या प्रकरणी ३३ अवैध नळ जोडण्या तोडण्यात आल्या असून पाण्याची चोरी करणार्‍यांना २ लाख ५१ हजार २00 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. अवैध नळ जोडणीच्या माध्यमातून महापालिकेच्या पाण्यावर डल्ला मारणार्‍या नागरिकांविरोधात प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी इराणी झोपडपट्टी, जुने शहरातील स्लम एरियात अवैध नळ जोडणीप्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्‍या नागरिकांची निकड लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु शहरातील मोठे उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर यांची दुकाने, हॉस्पिटलसह निवासस्थानी मोठय़ा प्रमाणावर पाण्याची चोरी केली जात असल्याचा मुद्दा ह्यलोकमतह्णने सतत उपस्थित केला. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाचा रोख आता ह्यक्रिम एरियाह्णतील रहिवाशांवर केंद्रित झाला आहे. जलप्रदाय विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्स येथे ४ अवैध नळ जोडण्या, बालाजीनगरस्थित ठाकूर अपार्टमेंट मधील १0, रामलता बिजनेस सेंटरमागील गुरुगणेश रेसीडेंसी येथे १0 अवैध नळ जोडण्या शोधून काढल्या. याप्रमाणेच हुतात्मा स्मारकजवळील दूरसंचार विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या निवासस्थानातील ४, उटांगळे मंगल कार्यालयातील एक तसेच सिंधी कॅम्पस्थित राधास्वामी अपार्टमेंटमधील ४ अवैध नळ जोडण्या थेट तोडण्यात आल्या. संबंधित नागरिकांना २ लाख ५१ हजारांचा दंड बजावला असता यापैकी ५९ हजार ४00 रुपये तत्काळ वसूल करण्यात आले. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कठोर पावलेउचलली असून एकीकडे मनपाच्या पाण्याची चोरी करायची, अन् दुसरीकडे मनपा प्रशासन मूलभूत सुविधा पुरवित नसल्याची ओरड करायची, हा दुटप्पीपणा चालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उच्चभ्रू, सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार्‍या सभ्य नागरिकांकडून ही अपेक्षा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.