शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आवारात अतिक्रमण; आज सुनावणी

By admin | Updated: June 29, 2015 02:06 IST

मनपाची आवारभिंत तोडून परिसरात कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटल्याचे प्रकरण.

अकोला: महापालिकेच्या जागेवर दावा असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संबंधित अतिक्रमकाने २३ जून रोजी मनपाची आवारभिंत तोडून परिसरात कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटले होते. या प्रकरणी २९ जून रोजी स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार असून, प्रशासनाच्यावतीने विधिज्ञ नेमकी काय बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनपाच्या पश्‍चिम भागातील जागेवर बिपीन मिरजामले नामक व्यक्तीने कोल्ड्रिंक्सचे दुकान थाटल्याचा प्रकार २३ जून रोजी उघडकीस आला. तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीतदेखील संबंधित अतिक्रमकाने दुकान उभारण्याचा प्रयत्न केला असता, तो डॉ.कल्याणकर यांनी हाणून पाडला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अतिक्रमकाने मनपाने उभारलेली आवारभिंत तोडून अनधिकृतपणे पुन्हा दुकान थाटले. या प्रकरणाची येत्या २९ जून रोजी न्यायालयात सुनावणी होत असून, आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त माधुरी मडावी यांची मिळमिळीत भूमिका लक्षात घेता, न्यायालयात प्रशासन काय बाजू मांडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मडावींना जबाबदारीचा विसर साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांच्याक डे प्रामुख्याने अतिक्रमण व मालमत्ता विभागाची जबाबदारी आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तपदी असलेले दयानंद चिंचोलीकर यांची बदली झाल्यामुळे माधुरी मडावी यांना उपायुक्तपदाचा प्रभार देण्यात आला. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सुरुवातीला बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण जमीनदोस्त करणार्‍या मडावींचे शहरात फोफावलेल्या अतिक्रमणाकडे होणारे दुर्लक्ष अनेकांच्या नजरेतून सुटले नाही. मनपा आवारात तंबू ठोकणार्‍या अतिक्रमकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल न करता केवळ साहित्य काढून उपायुक्त मडावी गप्प का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.