शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:08 IST

अकोला : रस्त्यावर अतिक्रमण थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईला आडकाठी निर्माण करीत कर्मचाºयांना धमक्या देणाºया अतिक्रमकांविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांलगत दुकाने थाटणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होते. ...

ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार

अकोला : रस्त्यावर अतिक्रमण थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईला आडकाठी निर्माण करीत कर्मचाºयांना धमक्या देणाºया अतिक्रमकांविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांलगत दुकाने थाटणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होते. चारचाकी वाहने, दुचाकी वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. अतिक्रमणासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून थातूरमातूर कारवाई केली जाते. दुसºया दिवशी त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे चित्र दिसून येते. अतिक्रमकांच्या मुजोरीमुळे खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावरून अक्षरश: पायी चालणे अवघड होते. ही बाब लक्षात घेता अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी पथकातील कर्मचाºयांसह या मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई सुरू केली. यावेळी श्रीकृष्ण द्वारसमोर थेट रस्त्यावर दुकाने उभारणाºया मुक्तार फ्रुटवाले यांसह काही अतिक्र मकांनी कारवाईला अडथळा निर्माण करण्यासोबतच पथकातील कर्मचारी संजय थोरात, नरेश बोरकर, महेंद्र डिकाव, योगेश उंटवाल, धीरज गांगे, विजय पथरोट, रणजित तंबोली व इतर कर्मचाºयांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.