शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात अतिक्रमण ‘जैसे थे’!

By admin | Updated: December 26, 2014 00:34 IST

वाहतुकीला खोळंबा; मनपाच्या मोहिमेला ग्रहण.

आशिष गावंडे /अकोला: अतिक्रमणाच्या समस्येला अक ोलेकर प्रचंड वैतागले आहेत. रस्त्यालगतचे अतिक्रमण व विस्कळीत वाहतुकीमुळे नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन रस्त्याने वाहने न्यावी लागतात. जागा दिसेल त्या ठिकाणी बिनधास्तपणे उघड्यावर ह्यबाजारह्ण मांडला जात आहे. यावर उपाय म्हणून मनपा प्रशासनाने जून महिन्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. ही मोहीम सतत सुरू ठेवण्याची अपेक्षा असताना, दीड महिन्यांत मोहीम गुंडाळण्यात आली. प्रशासनाने ज्या मार्गावरील अतिक्रमण हटवले, पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात अतिक्रमणाची समस्या पुन्हा डोके वर काढत आहे. जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार, कापड बाजार, बस स्थानक, लक्झरी बस स्थानक, धार्मिक प्रार्थनास्थळांसह खेळाच्या मैदानांनासुद्धा अतिक्रमणाचा विळखा आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात फोफावलेल्या अतिक्रमणाचा अकोलेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, यामध्ये प्रामुख्याने मुख्य बाजारपेठेत ठाण मांडलेल्या अतिक्रमकांचा समावेश आहे. शॉपिंग कॉम्पलेक्स, औषधी दुकाने, किराणा दुकानांसमोरच हातगाडी, फेरीवाले, चहा विक्रेता, पानटपरी चालक, पाणीपुरी विक्रेत्यांसह खाद्यपेय विक्रेत्यांनी बाजार मांडल्याचे चित्र दिसून येते. अकोलेकरांना सर्वाधिक त्रास गांधी रोड, जुना भाजी बाजार, मोहम्मद अली मार्ग,टिळक रोड, दाना बाजार, किराणा बाजार, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, काला चबुतरा परिसरात सहन करावा लागतो. अतिक्रमणाची समस्या कमी म्हणून की काय, रस्त्यात कोठेही वाहन उभे करणार्‍या ऑटोरिक्षाचालकांच्या मनमानीमुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.