शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी रस्त्यावर; कामकाज ठप्प

By admin | Updated: September 3, 2015 01:52 IST

संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

अकोला: कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बुधवारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील विविध सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले. देशव्यापी संपात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमधील महसूल कर्मचारी आणि विविध विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. या संपात महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील ३६७ कर्मचारी सहभागी झाले होते. विविध विभागातील कर्मचार्‍यांच्या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते. संपात सहभागी महसूल कर्मचारी संघटनेसह विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. कर्मचारी संपावर असल्याने शासकीय -निमशासकीय कार्यालयांमध्ये रिकाम्या खुर्चा-टेबल दिसत होते. तसेच एरव्ही शासकीय कार्यालय परिसरात दिसणारी नागरिकांची गर्दी न दिसता, शुकशुकाट जाणवत होता.

तीन संघटना अलिप्त

       शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपापासून काही संघटनांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ या तीन संघटनांचा सहभाग आहे.

 बँकांचे व्यवहार ठप्प

          शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बँकांच्या एआयबीओए, एईबीओ, इंटक आणि बीईएफओ या चार संघटनादेखील सहभागी झाल्याने राष्ट्रीयीकृत बँका बंद होत्या. परिणामी बुधवारी बँकेचे सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. असे असले तरी एटीएम सुविधा सुरू असल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला.

 आंदोलनात कृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचाही सहभाग

       केंद्रीय कर्मचारी व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. या संपाला राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्नित कृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पाठिंबा दिला व समितीचे अध्यक्ष संतोष राऊत यांचे नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली.