शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टबॉल स्पर्धेत एमराल्ड विजेता

By admin | Updated: August 24, 2014 00:46 IST

जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले. १४ व १७ वर्षाआतील मुली व १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद एमराल्ड स्कूलने पटकाविले. १४ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामना एमराल्ड हाईटस् स्कूल अकोली खुर्द व सरलाराम काकाणी मूर्तिजापूर संघात झाला. एमराल्डने हा सामना १४-३ अशा गुणांनी जिंकला. मुलींच्या गटातील सामना एमराल्ड स्कूल व सेन्ट अँन्स स्कूल, मूर्तिजापूर संघात होऊन एमराल्डने १९-९ गुणांनी विजय मिळविला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात नरसिंग विद्यालय आकोट व एमराल्ड स्कूलमध्ये अंतिम सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नरसिंग विद्यालयाने एमराल्डचा ५-४ ने पराभव केला. मुलींच्या गटातील सामना एमराल्ड स्कूल व शिवाजी विद्यालय राजंदा संघात झाला. एमराल्डने सामन्यावर १0-५ ने विजय मिळविला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटातील सामना व्यंकटेश बालाजी हायस्कूल मूर्तिजापूर व हरिभाऊ गव्हाणकर विद्यालय संघात झाला. स्पर्धेतील हा सामना प्रेक्षणीय ठरला. १0-८ गुणांनी सामना व्यंकटेश स्कूलने जिंकला. मुलींच्या गटातील सामना जसनागरा पब्लिक स्कूल रिधोरा व शिवाजी विद्यालय राजंदा संघात झाला. १५-५ गुणांनी सामना जसनागरा स्कूलने जिंकला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत पंच म्हणून रामेश्‍वर राठोड, पंकज कोकाटे, राहुल खंडारे, अमित गोतमारे, सागर निळे, अमोल वानखडे, तेजल खिलोसिया, भूषण गाडगे यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे होत्या. त्यांना प्रशांत खापरकर, राहुल जंगम, निशांत वानखडे यांनी सहकार्य केले.