शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीमध्ये प्रवेशाचा गुंता कायम!

By admin | Updated: September 4, 2015 22:51 IST

पुरवणी परीक्षा लवकर घेऊनही विद्यार्थ्यांची भटकंती.

खामगाव (बुलडाणा): जुलै २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल २६ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही मिळाल्या आहेत. आता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी शाळेत गेले असता, त्यांना प्रवेश मिळत नसल्याने अकरावीच्या प्रवेशाचा गुंता वाढला आहे. इयत्ता दहावीच्या मार्च २0१५ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये, याकरीता शासनाने ऑक्टोबरऐवजी जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा घेण्याचे धोरण अवलंबिले. त्यानुसार जुलै महिन्यात दहावीच्या पुरवणी परीक्षा होवून त्याचा निकालही जाहीर झाला. या पुरवणी परीक्षेत दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी शाळांमध्ये गेले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अगोदरच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांची पुरेसी संख्या असल्याचे कारण पुढे करून, पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. शिक्षण विभागाकडून संमतीपत्र आल्यानंतरच प्रवेश देणार असल्याचे काही शाळांनी स्पष्ट केले असून, त्यामुळे तालुका स्तरावर विद्यार्थी गटशिक्षणाधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, गटशिक्षणाधिकारी स्तरावरही याबाबत कोणताच आदेश नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पुरवणी परिक्षा लवकर घेवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला; मात्र अकरावीत प्रवेशच मिळत नसल्याने पुरवणी परीक्षा लवकर घेऊन कोणताही उपयोग झाला नसल्याचे चित्र दिसत आहे.