शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील चारही वीज अटकाव यंत्रांना ‘उतरती कळा’!

By admin | Updated: July 12, 2016 00:35 IST

प्रशासकीय उदासीनता ; वीज पडून तीन वर्षांत १0 जणांचा मृत्यू.

सुनील काकडे / वाशिमआकाशातून जमिनीकडे आकर्षित होणार्‍या विजेने गत तीन वर्षांंत जिल्ह्यातील तब्बल १0 लोकांचा बळी घेतला. याशिवाय शेकडो जनावरेही यामुळे जिवाला मुकली आहेत. असे असताना जिल्ह्यात आजपर्यंत केवळ ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्र उभी झाली असून, त्यांचीही आजरोजी दुरवस्था झालेली आहे.साधारणत: मे महिन्याच्या अखेरीस, जून महिन्याच्या प्रारंभी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक असते. या कालावधीतच विजांचा कडकडाट होऊन प्राणहानी होण्याची शक्यता उद्भवते. वाशिम जिल्ह्यात सन २0१३-१४ मध्ये एका इसमाचा वीज पडून मृत्यू झाला, २0१४-१५ मध्ये ७ जण गंभीररीत्या जखमी झाले, २0१५-१६ मध्ये वीज पडून ७ जणांना प्राणाला मुकावे लागले; तर एप्रिल २0१६ पासून आजपर्यंंत दोघांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला. दरम्यान, आकाशातून चकाकत येणारी वीज नेमकी कुठे पडेल, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी ठिकठिकाणी वीज अटकाव यंत्र (लायटिंग र्ओस्टर) उभारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात आजमितीस केवळ चार वीज अटकाव यंत्र असून, ती वाशिम नगर परिषद, वाराजहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून या यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष पुरविले गेले नसल्याने त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अस्तित्वातील वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती करून नव्याने आणखी यंत्र बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.विजेपासून करा स्वत:चे रक्षण!वीज पडून सन २0१३ पासून आजपर्यंंत १0 जणांना जीव गमवावा लागला. तथापि, विजांचा कडकडाट सुरू असताना प्रामुख्याने मोबाइलचा वापर टाळणे आवश्यक आहे. पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर यावे, झाडाखाली उभे राहू नये, अशावेळी विद्युत उपकरणे बंद ठेवणेच अधिक फायदेशीर असून, एकाचवेळी जास्त व्यक्ती एकत्र उभे न राहता दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवावे, आदी उपाय प्रामुख्याने केल्यास विजेपासून स्वत:चे रक्षण करणे शक्य होईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बाळासाहेब बोराडे यांनी दिली.