शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत जोडण्यांच्या घोळाची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:30 IST

एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता  येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी  ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत  गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित  अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश त्वरित अहवाल मागविलाप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागांमध्ये विद्युत मीटरचा तुटवडा असल्यामुळे नवीन  ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात कमालीची दिरंगाई होत अस ताना दुसरीकडे मात्र अनेक वीज ग्राहकांनी नियमांना डावलून  एकाच घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या घेतल्या  आहेत. एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता  येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी  ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत  गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित  अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.सध्या नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने नवीन वीज  जोडणी घेण्यासाठी ग्राहकांना प्रचंड हेलपाटे घ्यावे लागत आहे त. रीतसर अर्ज करून पैसे भरल्यानंतरही जोडणीसाठी अनेक  दिवस ‘वेटिंग’वर राहावे लागते. तांत्रिक बिघाड असलेले मीटर  बदलण्यासाठी अर्ज करणार्‍या ग्राहकांना तर तीन-तीन महिने  ‘वेटिंग’वर राहावे लागते. एकीकडे नवीन जोडण्यांसाठी रीतसर  अर्ज करणार्‍यांना ‘वेटिंग’वर ठेवणे, तर दुसरीकडे मात्र ‘अर्थ पूर्ण’ व्यवहार करणार्‍यांना एकापेक्षा अधिक जोडण्या देणे, असे  प्रकार सुरू आहेत. महावितरणच्या नियमानुसार एका व्यक्तीच्या  नावावर एकापेक्षा अधिक घरगुती वीज मीटर घेता येत नाही.  वाणिज्यिक जोडण्या मात्र कितीही घेता येतात. एकाच घरात  एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घ्यायच्या असतील, तर  त्यासाठी घराची विभागणी झालेली असणे गरजेचे आहे. महावि तरणच्या कर्मचार्‍यांच्या ‘मिलीभगत’ने अनेक वीज ग्राहकांनी  वीज वापराच्या कमी दराच्या ‘युनिट स्लॅब’चा फायदा मिळावा,  या हेतूने एकाच जागेवर एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या  घेतल्या आहेत. वीज ग्राहकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत  ‘लोकमत’ने चालविल्या वृत्तमालिकेची दखल घेत पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची  चौकशी करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे त.