शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!

By admin | Updated: June 18, 2017 02:00 IST

वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.कुरूम : येथील ऑक्सिजनवर असलेला वीज पुरवठा दहा-दहा मिनिटांनी खंडित होत असल्याने तसेच वादळी वार्‍याने नेहमी रात्रभर बत्ती गूल राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खंडित वीज पुरवठय़ामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत होत असून, गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या माना उपकेंद्रावरून कुरुमसह सात ते आठ गावांना वीज पुरवठा होतो; परंतु तांत्रिक बिघाडाने कुरुम व परिसरातील गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते. पावसाळा लागल्याने थोडा जरी वादळी वारा सुटला किंवा पाऊस आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. रात्री बिघाड झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. कुरुमवासीयांना नेहमीच एक दिवसाआड संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागत आहे. कुरुम येथे मुस्लीम बांधवांची संख्या जास्त असून, सध्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुरुम येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून, येथे एक कनिष्ठ अभियंता व सात कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र कनिष्ठ अभियंतासह एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्या वेळेस वीज पुरवठय़ात बिघाड होऊन खंडित झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते व दुसर्‍या दिवशी विद्युत कर्मचारी कर्तव्यावर आल्यावर तो बिघाड दुरुस्त झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होतो, तोपर्यंंत विजेशिवाय काम भागवावे लागते. मोठा बिघाड झाल्यास ६ ते ७ तास दुरुस्त करण्यात येत नाही. संपूर्ण कुरुम गाव हे ग्रा.पं.च्या नळ योजनेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून असल्यामुळे वीज पुरवठा खंडित राहिला तर कुरुम येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.  दिनोडा : चोहोट्टा वीज वितरण अंतर्गत येणार्‍या दिनोडा, मरोडा गावात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस सुरू होताच लाइन गूल होते. रात्रभर ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विद्युत वितरणचे दुर्लक्ष होत आहे.रेल फिडरवर गेल्या काही दिवसांपासून कधी ना कधी दैनंदिन तांत्रिक बिघाड होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रात्रभर लाइन बंद पडत असून, ग्रामस्थांना डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे थेंब पडले की लाइन बंद, असा प्रकार गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू आहे. सदर लाइन केव्हा सुरळीत होणार, याची संबंधित अभियंता यांनी लक्ष देऊन रेल फिडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. आलेगावात अधिकार्‍यांची दांडीआलेगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज पुरवठा विस्कळीत असताना वीज वितरणचे उप अभियंत्यांनी मात्र दांडी मारली आहे. खंडित वीज पुरवठय़ामुळे २७ गावांतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आलेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनवरून २७ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या २७ गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात रहावे लागते. मुख्यालयी अधिकारी आणि कर्मचारी राहत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. थोडास पाऊस आला, तरी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी वीज वितरणचे जे कामे करायला हवी होती, ती सुद्धा करण्यात आली नसल्याने वीज पुरवठा नेहमी खंडित होतो. दुर्गम भागातील चोंढी, पिंपरडोळी, चारमोळी, पांढुर्णा या गावांमध्ये, तर दोन-दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. या भागातील ग्रामस्थांना तक्रार करायची असल्यास दोन किमी पायदळ आलेगाव येथे जावे लागते. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.सध्या पावसाचे दिवस आहेत. आलेगाव परिसर मोठा व काही भाग जंगलात असल्याने अनेक वेळा वीज पुरवठा तांत्रिक कारणांनी बंद होतो. हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी नेहमी कर्मचारी कार्यरत असतात. तसेच कार्यालयातील हजेरी बुकवर आपण स्वाक्षरी केलेली नाही. - खंडारे, उप अभियंता, वीज उपकेंद्र आलेगाव