शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांच्या वसतिगृहासाठी प्रयत्न

By admin | Updated: August 24, 2014 00:30 IST

एचआयव्हीबाधित पालकांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांचे कायमस्वरूपी संगोपनाची व्यवस्था व्हावी, याकरिता वसतिगृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न

बुलडाणा : एचआयव्हीबाधित पालकांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांचे कायमस्वरूपी संगोपनाची व्यवस्था व्हावी, याकरिता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वसतिगृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी दिले. ह्यलोकमतह्ण मध्ये प्रकाशित वृत्तानंतर जिल्हाधिकारी यांनी काल २२ ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण, आरोग्य विभाग, एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांची एकत्रीत बैठक घेतली. या बैठकीला आयएमएचे राज्य प्रतिनिधी डॉ.जे.बी.राजपूत, डॉ.व्ही.एम.उबरहंडे, डॉ.गजेंद्र निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवाजी गजरे, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, जिल्हा पर्यवेक्षक गजानन देशमुख, नेटवर्क ऑफ बुलडाणाच्या मंगला उमाळे, गजानन जायभाये, अश्‍विनी बैरागी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व तहसीलदारांना संबंधित बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे निर्देश याआधीच आपण दिले आहेत; मात्र काही अटींमुळे, अनेकांना असा लाभ मिळणार नाही. या बालकांच्या संपूर्ण संगोपन व आरोग्य विषयक काळजी घेण्याकरिता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊ या. महिला बालकल्याण विभागाने यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करून यासंदर्भात पावले उचलावी, असे आवाहन त्यांनी केले. आयएमएने या मुलांना सर्व आरोग्यविषयक सेवा पुरविण्याची ग्वाही या बैठकीत दिली.